कोरोनामुळे शिर्डीचे साई मंदिर (Sai Temple of Shirdi) बंद असले, तरी इतर घडामोडींमुळे मात्र ते कायम चर्चेत आहे. नियम डावलून नियुक्ती केल्याचा आरोप झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) बदली करावी लागली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली, तर न्यायालयाने त्यांचे अधिकार गोठविले. आता त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला (court process) सामोरे जावे लागणार आहे. हे कमी म्हणून की काय, एका जुन्या प्रलंबित तक्रारीच्या चौकशीमध्ये आता संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला (CCTV footage to a social media channel) देऊन संस्थानाची बदनामी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
हा आरोप का करण्यात आला?
साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक (Officer Police Inspector) हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप आणि राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिराला भेट दिली
या संस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश व सदस्य सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी ३१ जुलै २०२१ रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली, परंतु त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. असे सांगत हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियातून यासंबंधीच्या बातम्या प्रसारितही झाल्या.
६ जण दोषी आढळले
आता सदर प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, परंतु याआधी बराच काळ चालढकल सुरू होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे (Sanjay Kale) यांनी यात लक्ष घालून याबद्दल न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी चालू झाली. त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ६ जण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खाजगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.