गेल्या पंधरा दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या न्यूझीलंडच्या माजी ऑलराऊंडर ख्रिस केन्सला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्याच्यावर सिडनी येथे उपचार सुरू आहेत. तर हृदयविकाराची शस्त्रक्रिया सुरू असताना त्याच्या पायांना अर्धांगवायूचा झटका आला.
आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया झाले
१० ऑगस्टला ख्रिस क्रेन अचानकच कोसळला. त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले असून, ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. ५१ वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ख्रिसला हृदयासंदर्भामधील समस्या असल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, मात्र त्याच्या शरीराने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे त्याची प्रकृती जास्त खालावली होती, असे एका इंग्रजी वेबसाईटने सांगितले होते. ख्रिसच्या हृदयामधील मुख्य धमणीला इजा झाली असून, अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये महाधमनी विच्छेदन (aortic dissection) असे म्हणतात.
न्यूझीलंडकडून त्याने क्रिकेटचे सामने खेळले
त्याने १९८९ ते २००६ या काळात न्यूझीलंडकडून २ टी-२०, ६२ कसोटी व २१५ वन डे सामने खेळले आहेत. नंतर तो समाचोलक म्हणून काम करायचा. कसोटीमध्ये त्याने पाच शतके आणि बावीस अर्धशतकांसोबत ३३२० धावा केल्या व २१८ विकेट्स घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर चार शतके आणि २६ अर्धशतकांसह ४९५० धावा व २०१ विकेट्स आहेत.
उदरनिर्वाहकरिता त्याला हे काम करावे लागते
२००८ साली भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघामार्फत खेळताना त्याच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप लावण्यात आले. परंतु त्याने हे सर्व आरोप फेटाळले होते व कायदेशीर लढाई देखील लढला होता. उदरनिर्वाहाकरिता आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याला बस डेपोच्या साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या २०१४ मध्ये समोर आल्या होत्या.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.