जगभरात कोरोना व डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत बोलावण्याची मुदत वाढवली आहे. कंपनीने एक मेल पाठवून यासंदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले होते, परंतु कोरोनामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नये, असे आदेश दिले आहेत. यानुसार आता अमेझॉनचे कर्मचारी येत्या ३ जानेवारी २०२२ पर्यंत घरूनच काम करणार आहेत.
कर्मचाऱ्यांना रिटर्न टू ऑफिस टाईमलाईन
अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलप्रमाणे, कर्मचाऱ्यांना रिटर्न टू ऑफिस टाईमलाईन ही स्थानिक परिस्थितीनुसार जागतिक स्तरावर वेगवेगळी असेल. कंपनीने यासंदर्भात धोरण बदलल्यास, त्याबाबत बदल केल्यास त्याबद्दल नोटीस पाठवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आपल्यामधील काही कर्मचारी हे त्यांच्या गावी जाऊन काम करत आहेत. त्यामुळे त्यांना परतण्याकरिता काही योजना आखाव्या लागतील, पण जेव्हा आमच्याकडे याबद्दल कोणती नवीन अपडेट आली, तर आम्ही ती तुम्हाला शेअर करू, अशी माहिती ने दिली आहे.
लसीचे दोन डोस घेणार नाहीत, त्यांना ऑफिसमध्ये प्रवेश नाही
अमेझॉनने कर्मचार्यांसाठी कामावर येण्याची डेडलाईन वाढवलीने या मेलमध्ये ज्या कंपन्या काही काळापर्यंत वर्क फ्राॅर्म होम करणार आहेत, अशा इतर काही कंपन्यांच्या नावांचासुद्धा उल्लेख केला आहे. गेल्या महिन्यात गुगल व फेसबुकने यासंदर्भाची घोषणा केली होती. गुगल व फेसबुकने यापूर्वी वर्क फ्राॅर्म होमची सुविधा येत्या काही काळापर्यंत वाढवली आहे. त्याव्यतिरिक्त अमेझॉनने कर्मचार्यांसाठी कामावर येण्याची डेडलाईन वाढवलीने सगळ्याच कर्मचाऱ्यांना लस घेणे अनिर्वाय केले आहे. जे कोणी कर्मचारी लसीचे दोन डोस घेणार नाहीत त्यांना ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, तर फेसबुक व गुगलने सगळ्याच कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य केले आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com