अश्लील चित्रपट बनविणे व प्रसारित करणे या आरोपांनी घेरलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ हिने नुकतेच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने पोस्ट शेअर करून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने लिहिले आहे की, जेव्हा हयात रिजन्सीमध्ये असे फोटो क्लिक केले गेले, त्यावेळी आम्ही तेथे सुमारे वीस लोकांबरोबर होतो. कोणतेही लैंगिक शोषण तिथे नव्हते… ना मी दारू प्यायले होते… ना मी ज्यूस प्यायले… व मी पूर्णपणे जागरूक होते… तिने पुढे लिहिले की, मी एका ऑटोमध्ये सेटवर गेले व दुसऱ्या ऑटोमध्ये सुखरूप परत आले… त्या याकरिता मला पैसेदेखील मिळाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अठरा वर्षांच्यावर आहे व एक कलाकार आहे. त्याचबरोबर गेहनाच्या या पोस्टवर राज कुंद्राचे नाव घेऊन नेटकऱ्यांनी खूप मजा घेतली आहे. गेहनाच्या फोटोवर कमेंट करताना एका युझरने लिहिले, ‘राज कुंद्राचे शूटिंग चालू आहे का?’
अटक न करण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ लाख मागितल्याचा दावा
इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गेहनाने मुंबई पोलिसांवर आरोप केला होता. अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी माझ्याकडे १५ लाख रुपये मागितल्याचा दावा तिने केला. गेहनाच्या म्हणण्यानुसार, पोलिसांमार्फत असे सांगण्यात आले आहे की, जर तिने पैसे दिले तर तिला अटक केले जाणार नाही. एवढेच नाही तर ती म्हणाली की, मी पोलिसांना पैसे दिले नाहीत, कारण मी काहीही चुकीचे केले नाही. मी काम केलेले सगळे व्हिडीओ बोल्ड होते, परंतु अश्लील नव्हते. अशा परिस्थितीत राज कुंद्रा व मी काहीही चुकीचे केलेले नाही, असा आरोप तिने केला आहे.
गेहनाला ४ महिन्यांआधीच अटक करण्यात आली
या प्रकरणामध्ये गेहनाला ४ महिन्यांआधीच अटक करण्यात आली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे, परंतु या आठवड्यात तिच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच गेहनाने एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की, मुंबई पोलिसांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले आहे. ती सतत पोलिसांना दोष देत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अश्लील चित्रपटप्रकरणी १९ जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा व प्रसारित करण्याचा आरोप आहे. राज कुंद्राला आता अखेर जामीन केव्हा मिळतो, यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.