अर्जेंटिना सोबत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाला.अर्जेंटिनाने २-१ ने हा सामना खिशात घातला.पराभव झाला असला तरीही भारताने सामन्यांत शेवटच्या क्षणांपर्यंत कडवी झुंज दिली,पण अर्जेंटिना सामना खिशात घालण्यात यशस्वी ठरला.त्यानंतर पंतप्रधानांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“टोकियो ऑल्मिपिक २०२० साठी आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवू त्यापैकी एक म्हणजे आमच्या हॉकी संघांनी केलेली आश्चर्यकारक कामगिरी.आज खेळांच्या माध्यमातून, आमची महिला हॉकी टीम धैर्याने खेळली आणि उत्तम कौशल्य दाखवले. संघाचा अभिमान आहे. पुढील खेळासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा” असं मोदी ट्वीटरच्या माध्यांमधून म्हणालै आहेत.
One of the things we will remember #Tokyo2020 for is the stupendous performance by our Hockey teams.
Today and through the Games, our Women’s Hockey team played with grit and showcased great skill. Proud of the team. Best of luck for the game ahead and for future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2021
अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोआल बारिनोवोने दोन गोल केले.सामन्याच्या चौथ्या सत्रात भारताला 10 मिनिटे शिल्लक असताना पेनेल्टी कॉर्नर मिळाला,पण त्यांना गोल करता आला नाही.त्यामुळे अर्जेंटेनियाने हा सामना खिशात घातला. भारतासाठी पदकाची आशा कायम आहे.भारताचा आता कांस्यपदकासाठी ६ ऑगस्टला ब्रिटन सोबत सामना होणार आहे.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.