गेल्या काही दिवसांपासून जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू जीवाचं रान करून खेळत आहेत. परंतु भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोनच पदकं पडली आहे. त्यातच आता भालाफेक स्पर्धेत भारताच्या आशा उंचावल्या आहेत.
भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने धडाकेबाज कामगिरी केली आहे. आज सकाळी भालेफेकीचा सामना सुरू झाला. फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू होती. क्वालिफाइंग राऊंडमधून फायनल गाठण्यासाठी नीरजला 83.5 मीटरचं टार्गेट देण्यात आलं होतं. पण त्याने 86.65 मीटरवर भाला फेकून दाखवला. क्वालिफाइंग राऊंडमध्येच नीरजने आपल्या महत्वकांक्षा स्पष्ट केल्या आहेत. क्वालिफाइंग राऊंडमधून ग्रुप ए मध्ये नीरजने अव्वल स्थान गाठलं आहे. त्याचबरोबर त्याने फायनलमध्ये दमदार एन्ट्री देखील मारली आहे. नीरजसोबतच भारताचा आणखी एक भालाफेकपट्टू शिवपाल यादव याच्याकडून देखील भारताला पदकाची अपेक्षा आहे.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.