तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून, त्यानंतर अफगाणिस्तानातील प्रत्येक व्यक्ती घाबरली आहे. अफगाणिस्तानमध्ये असलेले लोक आपला जीव वाचवण्याकरिता विमानाला लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील घटनेवरून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने वादग्रस्त ट्विट केले होते. स्वराने हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानशी केल्यामुळे नेटकऱ्यांकडून स्वराला ट्रोल केले जात आहे. इतकेच नव्हे, तर तिला अटकसुद्धा झाली पाहिजे अशी मागणीदेखील नेटकऱ्यांनी केली आहे. आता या वादात बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणावतनेही स्वराच्या ट्विटद्वारे उत्तर दिले आहे.
चीन व अमेरिकेचे असलेले कटकारस्थान
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून स्वराचे ट्विटही शेअर करत कंगनाने स्वराला चांगलेच उत्तर दिले आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये दहशतवादी हल्ले व ते करणाऱ्यांची नावेसुद्धा दिली आहेत. कंगनाने स्वराला दिलेले सडेतोड उत्तर आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. “हिंदुत्वामध्ये जहाल या शब्दाचा अर्थ दहशतवाद असा होत नाही, तर मोक्ष व समाधी असा आहे. उगाच विषय फिरवू नको. आपल्यासमोर असलेल्या परिस्थितीचा सामना कर, हे सर्व केवळ अफगाणिस्तान नाही, तर भारताच्या विरोधात चीन व अमेरिकेचे असलेले कटकारस्थान आहे,” या आशयाचे कॅप्शन देत कंगनाने स्वराची पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाली होती स्वरा?
“आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही. तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येक जण हैराण झाला आहे. आपण तालिबानी दहशतीने शांत नाही होऊ शकत व आपण सर्व हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होत असतो. आमचे मानवी व नैतिक मूल्य हे पीडित अथवा उत्पीडितच्या ओळखीवर अवलंबून आहे,” असे ट्विट स्वराने केले आहे. हिंदुत्वाची तुलना तालिबानी दहशतवादासोबत केल्याने नेटिझन्स चांगले खवळले आहेत.
स्वराला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते
नेटिझन्सनी स्वराला चांगलेच फैलावर घेतले असून, भादंविच्या कलम २९५ ए अन्वये धार्मिक भावनांना ठेच पोहचविल्यामुळे याच प्रकरणी स्वराला तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते, असे ट्विट एका युझर्सने केले आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे, असेसुद्धा त्याने म्हटले आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.