स्रोत: रत्नागिरी खबरदार
पुणे : कोरोना काळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाल्यावर योजनांचा लाभही भारतीयांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या गोखलेनगर भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानणारी दोनशे पत्र त्यांना पाठवली आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पत्रं पोस्टात टाकण्यात आली. त्याप्रसंगी संयोजक पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल, शिवाजीनगर अध्यक्ष सतिश बहिरट, प्रभागध्यक्ष लक्ष्मण(अण्णा) नलावडे आदी उपस्थित होते.
बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मोफत अन्नधान्य वितरण, घरोघरी जाऊन लसीकरण, आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज या पत्रांतून व्यक्त करण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.