Download Our Marathi News App
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेने अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर देशातील राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपविरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आपल्या देशात चोराला चोर म्हणणे देखील गुन्हा झाला आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची उमेदवारी अखेर रद्द करण्यात आली आहे. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा झाला आहे. देशातील चोर, दरोडेखोर अजूनही मोकाट असून राहुल गांधींना शिक्षा झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधींच्या बाबतीत हा निकाल म्हणजे थेट लोकशाहीची हत्या आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढ्याला दिशा द्यावी लागते, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आहेत.
#राहुलगांधीयांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आपल्या देशात चोर, चोर म्हणणे हा गुन्हा झाला आहे. चोर आणि लुटारू अजूनही मोकळे आहेत आणि राहुल गांधींना शिक्षा झाली. ही थेट लोकशाहीची हत्या आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. ही शेवटची सुरुवात आहे… pic.twitter.com/uubBUmsqeY
— ANI (@ANI) २४ मार्च २०२३
हे पण वाचा
विधानसभेत विरोधी पक्षांची अनुपस्थिती
राहुल गांधी यांची उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाचा महाविकास आघाडीने तीव्र निषेध केला आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनात ठरावाची शेवटच्या आठवड्यात चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची बातमी आली. विरोधी पक्षांनी हे वृत्त समजताच विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत लोकसभेच्या निर्णयाला विरोध केला.