नागपूर : महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतले. त्यामुळे मृतप्राय काँग्रेस पार्टी जिवंत होऊ शकली असे प्रतिपादन शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी केले. ते मंगळवारी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी जैयस्वाल म्हणाले की, “हे काँग्रेसचे लोक मेले होते तुम्ही, त्यांना कोणी विचारत नव्हते.
उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतले म्हणून हे मेलेले लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती. त्यांना कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे. आशिष जैयस्वाल हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातील शिवसेना समर्थक आमदार आहेत. त्यांनी 2019 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.