मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. स्मारकात आल्यानंतर प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांशीही भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते. यावेळी राणे यांना स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आणि सावरकरांचे ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी राणे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार आदी उपस्थित होते.