मुंबई /प्रतिनिधी – जेष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासनाच त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांच निधन झाल. दिलीपकुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत झाला आहे. मुगल-ए-आझम,गंगा-जमुना, आन बाबूल, दीदार, मधुमती, देवदास, राम और श्याम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर आदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.या महान कलावंताला नेशन न्युज मराठी टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
Credits and Copyrights – Streams7news.com