मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत असतात. अशात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झालं हे भाजपचंच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com