भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच आरोप केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नांगरे पाटील यांची निष्ठा भ्रष्टाचारी मंत्र्याशी असल्याचा खळबळजनक वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. Vishwas Nangre Patil
कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना पोलिसांनी मला सहा तास घरात कोंडून ठेवलं, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्कात होते. आपण कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहात, पण कोणाला कर्तव्यदक्ष राहिेले, तर गैरकायदेशीर काम करणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना. तुमची निष्ठा तिथे आहे, इथे नाही. इतके दिवस झाले मुंबई पोलिसांनी का माफी मागितली नाही ते सांगवं. किंवा त्यांनी स्पष्ट करावं की वरुन आदेश होता, माझी काही हरकत नाही असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.Vishwas Nangre Patil
Credits and copyrights – nashikonweb.com