येत्या 9 ऑगस्टला कंपनी भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे.विवो Y53s च्या सीरिजमधील तिसरा फोन असेल. याआधी या सीरिजमध्ये Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G हे स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.
स्पेसिफिकेशन्स
Vivo Y53s स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले, Helio G85 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 64 मेगापिक्सल आहे. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
किंमत
या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल. या व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते.
कलर
हा फोन डीप सी ब्लू आणि फॅन्टास्टिक रेनबो अशा दोन रंगात विकत घेता येईल.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.