बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण पट्ट्यात, गोवा, मध्य महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ ओडीशा आदी भागात पुढील पाच दिवस तीव्र ते अति तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला १३ सप्टेंबर आणि कोकण, गोव्यामध्ये १३-१४ सप्टेंबरला अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर सायक्लॉन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी पुढील ४८ तासांत हे वारे आदळणार असून ते पुढे पुढील तीन दिवसांत ओडीशावरून छत्तीसगढकडे जातील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.