पुणे : भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी राज्यात पावसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होऊ शकते. राज्यात ७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अहमदनगर, बीड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, हिंगोळीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.