मुंबई : कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमुद केले की, किरीट सोमय्या यांच्या जीवाचा धोका आहे. मग कोल्हापुरमध्ये जमाव निर्माण करून सोमय्या यांच्या जीवाला काही घातपात करण्याचा तर कट नव्हता ना, असा संशय निर्माण होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त आज पत्रकार परिषदेत केली.
दरेकर म्हणाले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असेही म्हटले आहे की, अशाप्रकारच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांना कळवले जाते. गृहमंत्री सांगतात की, जिल्हाधिकारी स्तरावरची ही कारवाई आहे. त्यामुळे आम्हांला कळवले नव्हते. तर, शिवसेना खासदार संजय राऊत एकाबाजूला बोलतात की, मुख्यमंत्री कार्यालयाला यासंदर्भात काही माहिती नव्हती. मुख्यमंत्र्यांशी या सर्वांशी काही संबंध नाही. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे या दोन्ही पक्षांत किती आलबेल आहे, हे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची कशी घोडदौड चालू आहे हे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. सर्व बाबतीत कायदेशीर लढाई लढायला आम्ही पण तयार आहे. कर नाही तर डर कशाला. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रकरणे काढली म्हणून आता आमच्या पक्षांच्या नेत्याचे खोदकाम सुरू आहे. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की किती खोदकाम केले तरी भारतीय जनता पक्षाची प्रकरणे सापडणार नाहीत. कर नसेल तर डर असायचे कारण नाही. त्यामुळे भाजप अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार भावना गवळी यांच्या प्रकरणाविषयी सोमय्या वाशिमला गेले होते. अनिल परब यांच्या संदर्भातही ते रत्नागिरी येथे गेले होते. दोन्ही ठिकाणी सुरळीत जाऊन आले मग कोल्हापुरात नेमके काय आहे की मुश्रीफ यांना हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरवावा लागले. तसेच जिल्हाधिका-यांनी काढलेल्या ऑर्डरमध्ये सोमय्या यांच्या जीविताला धोका असल्याचे का नमूद केले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.