ठाणे शहरास पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजांवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे.
त्यामुळे आज दि. १.०३.२२ मध्यरात्रीपासून पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होईल. सदर तांत्रिक बिघाड दुरूस्तीनंतर पाणी पुरवठा सुरुळीत होईल.
तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.