
कल्याण – डोंबिवली दि.19 ऑगस्ट :
केडीएमसीच्या नेतीवली जलशुद्धीकरण केंद्र आणि मोहिली जलशुद्धीकरण – उदंचन केंद्रात येत्या मंगळवारी 25 ऑगस्ट 2021 देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामूळे नेतीवली आणि मोहिली केंद्रांतून डोंबिवली पूर्व – पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि कल्याण पश्चिमेच्या भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंद नगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज आणि कल्याण स्टेशन परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
This News has been retrieved from RSS Feed. If you Own this news please contact us for credits.