मुंबई : आज सकाळपासून शिवसेनेमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी सनसनाटी पत्रकार परिषद घेत स्वपक्षीयांवरच गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे हिंगोलीमधील खासदार हेमंत पाटील यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये आमचं १०० टक्के नुकसान होत आहे. या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत. यावेळी हेमंत पाटील यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं म्हणणारे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असा विचार कुणी करू नये. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता याचा विचार करा, असा टोला हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.