कल्याण/प्रतिनिधी – उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत केंद्रीय सामाजिक विकास मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले. कल्याणातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
राज्याच्या राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण गेले अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत..हा वाद मिटला पाहिजे. नारायण राणे यांनी आपल्याला सत्तेचा अशा पद्धतीने कारवाई हा नारायण राणे यांच्यावर अन्याय. बोलले।म्हणून अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाहीये. शिवसेनेकडून .नारायण राणेची भाषा ही शिवसेनेची भाषा त्यांचें आयुष्य गेलेलं आहे.. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
This News has been retrieved from RSS feed, We do not claim or own copyrights or Credits.if you Still have problems contact us.