सिंधुदुर्ग : कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी वर्ग आज पासून सुरू झाले आहेत. तब्बल दिड वर्षांनंतर शाळेची घंटा पुन्हा खणाणली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी विद्येच्या मंदिराची दार उघडली. आज शहरातील शाळांमध्ये सकाळी उपस्थित विद्यार्थ्यांच टेंमपरेचर चेक करण्यात आले. तपासणी नंतर सोशल डिस्टंसिंग, कोरोना नियम पाळत विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार असून पुन्हा एकदा शालेय जीवन विद्यार्थ्यांना अनुभवता येणार असून गेले वर्षभर घरात बसून ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेल्या विद्यार्थी, शिक्षकांनी विद्यामंदिरात मोकळा श्वास घेतला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.