मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढले होते. त्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी भाजपचा समाचार घेतला आहे. या घटनेला पाच वर्षे झाली. त्यावेळी तुम्ही झोपला होता का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे.भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं, असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.