मुंबई : उत्तर प्रदेशात जिवंत शेतकरी चिरडले गेले. पण त्याच वेळी देशातील मीडिया शेतकऱ्यांच्या मागे उभा न राहता ड्रग्ज प्रकरणाशी खेळत राहिला. मुंबईत जे कुणी सापडले त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
गुजरातमध्ये 21 कोटींचं ड्रग्स सापडलं त्याचं काय?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. देशात ड्रग्स पुरवठा कुठून होतो? तर गुजरात, जम्मू मध्ये ड्रग्ज मिळतात, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.
देशात अमली पदार्थ व्यापार वाढलाय. जगातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा सापडला त्यावर केंद्र काहीच बोलत नाही. त्यावरही केंद्राने बोलायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.