स्रोत: रत्नागिरी खबरदार
पुणे : केवळ विचारधारा पटत नाही म्हणून विकासाला अडथळा आणणार नाही. ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तसे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बारामतीमधील इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोले लगावले. इन्क्युबेशन सेंटर उभारणारी संस्था तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम करते. हे काम खूप आव्हानात्मक आणि मोठं आहे. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवण्याचं केंद्र म्हणतात. आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवलं. त्यात नको ती अंडी उबवली. त्यांचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबतच्या २५ वर्षांच्या युतीवर खोचक भाष्य केलं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.