हायकोर्टाने ११ वी प्रवेशाकरिता सीईटी परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने एक नवा निर्णय घेतला आहे. अकरावी प्रवेशाकरिता प्रक्रिया सुरू केली असून, MMRDA विभागाकरिताच्या प्रक्रियेची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. मुंबई, रायगड, ठाणे, पुणे व पिंपरी-चिंचवड या भागांकरिता ११ वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यामधील उर्वरित भागांमध्ये महाविद्यालय पातळीवर प्रवेश होणार आहे. यावरूनच १४ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे.
ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला सुरुवात होणार
महाराष्ट्र राज्य मंडळासोबत संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना व सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज याबाबत माहिती देताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकदेखील ट्विट केले आहे. राज्य सरकारने ११ वी सीईटी परीक्षेकरिता काढलेला आदेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी याबाबत संपूर्ण वेळापत्रक ट्विटद्वारे शेअर केले आहे. त्यानुसार १४ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करून हे नोंदणी करू शकतील. नियमित प्रवेशाचा पहिला राऊंड २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
मुंबई हायकोर्टाचा निकाल पाहूनच पुढील निर्णय घेऊ
राज्यामध्ये ११ वी प्रवेशकरिता होणारी CET अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली असून, मुंबई हायकोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिला. १० वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशाकरिता २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित होती, परंतु हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने ११ वी सीईटी परीक्षेकरिता काढलेला आदेश मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ११ वीच्या प्रवेशाकरिता CET परीक्षेचा आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी ॲडमिशन प्रोसेसकरिता पुढे काय करता येणार आहे. यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. उच्च न्यायालयाने काय म्हटले आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
Credits and. Copyrights – May Marathi