गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅप प्रत्येक अपडेट सोबत अॅप मध्ये काही तरी बदल करीत आहे. व्हॉट्सअॅपने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे. त्यामुळे आता आपल्या व्हाईस मेसेज फीचरमध्ये खूप सारे बदल होणार आहे. याबाबत जाणून घेऊयात सविस्तर.
व्हाईस मेसेज सोबत आता येणार व्हाईस वेवफॉर्म्स :
व्हाईस वेवफॉर्म्स व्हाईस मेसेजला खास बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे अशी माहिती समोर येत आहे की, व्हाईस वेवफॉर्म्स घेवून येण्याची तयारी करीत आहे.
सध्या आपल्या व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज ऐकायचा असेल तर त्यात एक सरळ लाईन बनवून येते. मेसेजची मर्यादा दर्शवते.
● व्हॉट्सअॅपचे हे फीचर व्हाईस वेवफॉर्म्स त्या लाईनला आता लहरीसारखा आकार आहे. हे वेवफॉर्म्स मेसेज सोबत बदलू शकता. मेसेज संपल्यानंतर ते शांत होतात.व्हाईस मेसेज पाठवण्याआधी ऐकता येणार : आता या नवीन अपडेटमध्ये तुम्ही व्हाईस रेकॉर्डिंगला मध्येच बंद करू शकाल. आपल्या मेसेजला पाठवण्याआधी तुम्ही ते ऐकू शकाल. जर तुम्हाला ते चांगले वाटत नसेल तर तुम्ही त्याला डिलीट करू शकाल.
हे नवीन फीचर कधी मिळणार? : व्हॉट्सअॅप ने अँड्रॉयड 2.21.18.3 अपडेटसाठी व्हॉट्सअॅप बीटा रोल आउट करणे सुरू केले आहे. याच पद्धतीने व्हॉट्सअॅप बीटा iOS 2.21.170.15 सुद्धा रोलआउट केले जात आहे.
आता आणखी नवीन काय येणार? : व्हॉट्सअॅप ने आणखी एक फीचरवर काम करणे सुरू केले आहे. इंस्टाग्राम प्रमाणे आता व्हॉट्सअॅप सुद्धा मेसेजवर इमोजी प्रतिक्रिया देवू शकाल.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.