किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही म्हटलंय. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवल्याचं स्पष्टीकरणही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई कोणी केली? याबाबत अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं दिसत आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, याबात जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयानं घेतला. ही वस्तूस्थिती आहे. या कारवाईबाबत शरद पवारांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. काल जी परिस्थिती कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. ती त्यांनी गृहविभागाला कळवली. त्यानंतर दोन्ही पक्ष समोरा-समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली.”
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.