श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी कल्याणमध्ये (kalyan) आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांनी उपस्थिती लावली होती. या आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला होता. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध सांगणारे प्रशासन मात्र आत्ता झोपी गेले का? असा संतप्त प्रश्न कोरोना नियमावलीचे पालन करणाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोना नियमावलीचे पालन येथे करण्यात आले नव्हते
कल्याण पश्चिममधील सॉलिटर हॉलमध्ये जन्माष्टमीनिमित्त संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आल्या होत्या. त्यांची गाणी ऐकण्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामध्ये विशेषत: तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. गाणी चालू होताच अनेकांना त्यांच्या तोंडावर मास्कदेखील लावलेला नाही याचा विसर सोयीस्कररीत्या पडला. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कोरोना नियमावलीचे पालन या ठिकाणी करण्यात आले नव्हते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामधून हे सगळे उघड होत आहे. एकीकडे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारमार्फत केले जात आहे, परंतु काहींनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले तरीही त्याची दखल सरकारी यंत्रणेमार्फत घेतली जात नसल्याची बाब यातून उघड झाली आहे.
सणानंतर कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढणार
लॉकडाऊनचे नियम सध्यातरी शिथील आहेत, परंतु सर्व प्रकारात शिथिलता असताना नियम पाळले नाहीत, तर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. विशेषत: सणानंतर कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढणार, अशी दाट शक्यता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेपश्चात सरकारी यंत्रणा कोरोना नियमावली राबविण्यात भेदभाव करीत आहे का? असा प्रश्न सदर घटनेतून उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारची बेफिकिरी ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.