बदलापूर/प्रतिनिधी – बदलापुर आर्ट गेलरीत रोटरी क्लब आणि भारत कॉलेजच्या वतीने वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहेया प्रदर्शनात निसर्ग, प्राणी, पक्षी, फुलं अशी १५० दुर्मिळ छायाचित्र आपल्याला पाहता येणार आहेत. २५ छायाचित्रकारांनी भारतभर फिरून ही छायाचित्र काढली आहेत. कंदीलफुलं, सरपटणाऱ्या पाली, घोरपडी, साप, कासव, दुर्मिळ पक्षी, वाघ यांची छायाचित्र या प्रदर्शनात आहेत. भारतात फुलांच्या ६० प्रकारच्या प्रजाती असून महाराष्ट्रात त्यापैकी २७ प्रजाती आढळतात. त्यांचीही छायाचित्रं या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. भारतात मोजून चारच उरलेल्या लेसर फ्लोरिकन, म्हणजे तनेर पक्ष्याचाही फोटो या प्रदर्शनात पाहता येईल. ९ ऑगस्ट पासून प्रदर्शनाला सुरुवात झाली असून २२ ऑगस्टपर्यंत दररोज संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. निसर्गप्रेमी बदलापूरकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असं आवाहन बदलापूर आर्ट गॅलरीचे राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे .
Thane News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असून, आकडा दीडशेच्या पुढे
ठाणे : जागतिक कोरोना महामारीबाबत पुन्हा एकदा धोक्याची बातमी समोर...