दिल्ली येथील हॉटेल आयटीसी मौर्य (Hotel ITC Maurya) येथे असलेल्या एका सलूनमध्ये २०१८ साली तेथील कर्मचाऱ्याने एका महिलेचे चुकीच्या पद्धतीने केस कापल्याबद्दल व योग्य ती वागणूक न दिल्याबद्दल तिला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (National Consumer Disputes Redressal Commission) सदर सलूनमार्फत मिळवून दिली आहे. या चुकीमुळे महिलेला आपले संपूर्ण केस (Hair) गमवावे लागले होते. तक्रार करणारी महिला हेअर प्रोडक्टसाठीची मॉडेल (Model for hair product) होती. या प्रकरणावर आर. के. अग्रवाल व एस. एम. कांतीकर यांनी निर्णय सुनावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महिला आपल्या केसांबद्दल खूपच संवेदनशील असतात. आपले केस चांगले राहावे, याकरिता त्या बरेच प्रयत्न करत असतात. त्यामुळे या महिलेकरिताही तिचे केस फार महत्त्वाचे होते.
नेमकं प्रकरण काय?
महिला आपल्या केसांबाबत भावनिक असतात. तक्रारदार महिला ही आपल्या लांब केसांमुळे हेअर प्रोडक्टकरिता मॉडेलिंग करायची. तिने VLCC व पॅन्टीनसारख्या प्रोडक्टकरिता मॉडेलिंग केले आहे, परंतु सलूनच्या एका चुकीमुळे तिला आपले लांब केस कापावे लागले. त्यामुळे तिचे बरेच नुकसान झाले आहे. यासोबत भविष्यात टॉपची मॉडेल बनण्याचे तिचं स्वप्न भंगले असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. १२ एप्रिल २०१८ रोजी या महिलेने हॉटेल आयटीसी मौर्य (Hotel ITC Maurya) या सलूनला भेट दिली. तिला रेग्युलर हेअरकट (Regular haircut) करायची होती. तिने, आपल्या नेहमीच्या स्टायलिशने माझा हेअरकट करावा असेही सांगितले, परंतु त्यावेळी तो तिथे उपस्थित नसल्याने स्टाफमधील दुसऱ्या स्टायलिशने महिलेचा हेअरकट केला. आपल्या तक्रारीत तिने म्हटले की, मी हेअरस्टायलिशला सांगितले, खालच्या बाजूने फक्त ४ इंचच सरळ केस काप, पण जेव्हा मी आरशात पाहिले त्यावेळी मला धक्का बसला. कारण त्याने माझ्या डोक्यावर चार इंचापेक्षा कमी केस ठेवले होते.
कारणामुळे महिलेला फार नुकसान झाले
तक्रारदार महिलेने पुढे सांगितले की, सलूनच्या कर्मचाऱ्यांनी तिला ट्रिटमेंटची ऑफर (Offer of treatment) दिली, परंतु हे संशयास्पद होते व त्यामुळे तिच्या केसांचे नुकसान झाले. केसांच्या ट्रिटमेंटमुळे तिच्या टाळूवर खूप वेदना होऊ लागल्या व डोक्याला खाज सुटली होती. केमिकल वापरून केलेल्या ट्रिटमेंटमुळे (treatment) तिच्या टाळूला कायमचीच दुखापत झाली. याच कारणामुळे महिलेला फार नुकसान सहन करावे लागले. तिची नोकरीसुद्धा गेली. महिलेने सांगितले की, लांब केसांची सवय असताना या स्टाफने माझ्या डोक्यावर चार इंचापेक्षा कमी केस ठेवले होते. त्यामुळे मी मानसिकरीत्या (Mentally) फारच खचले होते. आरशात पाहणे सोडून दिले होते. माझा आत्मविश्वास या काळात पूर्णपणे ढासळला होता. तिने मीटिंग व आपल्या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे तिला याचा मोठा तोटा सहन करावा लागल्याचे कोर्टाने म्हटले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.