मुंबई : पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Yellow Alert in Maharashtra) हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.