आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेकदा मराठी चित्रपटांना संधी मिळते. त्याचप्रमाणे ‘येरे येरे पावसा’ हा मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगलाच गाजतोय. आता इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवासाठी ‘येरे येरे पावसा’ ची निवड झाली आहे.
‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शफफ खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शारीक खान आणि बटरफ्लाय फिल्म्सने केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
टोरंटो,कॅनडा आणि टोकियो या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आता ‘जीफोनी’ महोत्सव गाजवायला सज्ज झाला आहे. एलिमेंट सहा या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. ‘जीफोनी’ महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ६ ते ९ या वयोगटातील ८०० मुलं परीक्षक असणार आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com