मुंबई : केवळ दाखवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढू नका. फसवणूक करणारा अध्यादेशच नकोच नको. कायद्याच्या कसोटीवर टिकणारा अध्यादेश काढा. हवं तर आम्ही राज्यपालांकडे येतो, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने पाठवलेल्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सल्ला मागितला आहे. त्यावर फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे विधान केलं. राज्यपालांनी अध्यादेशातील काही त्रुटींवर बोट ठेवलं आहे. राज्यपालांची ही कृती राज्याच्या हिताची आहे. पण सत्तेतील मंत्री त्रुटीवर उपाय काढण्याऐवजी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याचा अर्थ त्यांना ओबीसींना फसवायचे आहे. केवळ दाखवण्यासाठी त्यांना अध्यादेश काढायचा आहे. असं करू नका. त्याला उत्तर द्या. हवं तर आम्ही राज्यपालांकडे तुमच्यासोबत यायला तयार आहोत. पण फसवणुकीचा अध्यादेश नको. टिकला पाहिजे असा अध्यादेश काढा. राज्यपालांनी जी त्रुटी सांगितली ती त्यांची नसून तुमच्या विभागानेच उपस्थित केली आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.