नवी दिल्ली : WhatsApp | आता कोविड लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सुद्धा करू शकता. आरोग्य मंत्रालय आणि MyGov नुसार, जवळचे लसीकरण केंद्र शोधण्यासाठी आणि आपला व्हॅक्सीन स्लॉट बुक करण्याचे काम तुम्ही व्हॉट्सअपद्वारे (WhatsApp) सुद्धा सहज करू शकतात. यासाठी नंबर जारी करण्यात आले आहेत. MyGovIndia च्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.WhatsApp
लोकांसाठी सोपे झाले व्हॉट्सअपवरून बुकिंग
MyGov चे सीएओ आणि NeGD चे अध्यक्ष अभिषेक सिंह यांनी म्हटले, लसीकरण प्रमाणपत्र सुद्धा व्हॉट्सअपवर डाऊनलोड करता येईल. आता लोकांना व्हॉट्सअपवर AI-आधारित इंटरफेसला नेव्हिगेट करणे सोपे वाटते. चॅटबोटची प्रत्यक्ष क्षमता अनलॉक करण्यासाठी व्हॅट्सअपचे आभारी आहोत.
व्हॉट्सअपद्वारे असा बुक करा स्लॉट
– कॉन्टॅक्ट लिस्टच्या रूपात MyGov कोरोना हेल्पडेस्क 9013151515 नंबर नोंदवा.
– व्हॉट्सअपवर या नंबरवर Book Slot लिहून पाठवा.
– एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त 6 अंकाचा ओटीपी नोंदवा.
– व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्या पसंतीची तारीख, ठिकाण, आधार, पिनकोड आणि व्हॅक्सीन प्रकार निवडा.
– स्लॉट प्राप्त करा आणि ठरलेल्या दिवशी लसीकरण केंद्रावर जा.
असे डाऊनलोड करा व्हॅक्सीन सर्टिफिकेट
– संपर्क नंबर सेव्ह करा : +91 9013151515
– व्हॉट्सअपवर ‘कोविड सर्टिफिकेट’ टाईप करा आणि पाठवा.
– ओटीपी नोंदवा.
– प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
Revolutionising common man’s life using technology!
Now get #COVID19 vaccination certificate through MyGov Corona Helpdesk in 3 easy steps.
Save contact number: +91 9013151515
Type & send ‘covid certificate’ on WhatsApp
Enter OTP, Get your certificate in seconds.
— Office of Mansukh Mandaviya (@OfficeOf_MM) August 8, 2021
Credits and copyrights – nashikonweb.com