रिलायन्स जिओ (Reliance Jio) जवळ बरेच प्रीपेड, जिओ फोन, पोस्टपेड व जिओ फायबर प्लॅन्स आहेत. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता नवनव्या ऑफर्स दिल्या जातात. जिओ फायबरच्या (jio fiber) चार प्लॅन्समध्ये तब्बल तेरा ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन (Subscription) मोफत दिले जात आहे. रिलायन्स जिओच्या फायबर प्लॅन्सची किंमत तीनशे नव्यान्नव रुपयांपासून ते आठ हजार चारशे नव्यान्नव रुपयांपर्यंत असून, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा व ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. त्याचबरोबर अनलिमिटेड (Unlimited) डेटादेखील मिळत आहे. १४९९ रुपये, २४९९ रुपये, ३९९९ रुपये व ८४९९ रुपये, असे हे चार प्लॅन्स आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यामध्ये नक्की काय फायदे मिळणार आहेत.
पहिल्या प्लॅनमध्ये या ॲप्सचा समावेश असेल
हा प्लॅन १४९९ रुपयांचा असून, व्हॅलिडीटी (Validity) तीस दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार असून, युझरला ३०० एमबीएसचा इंटरनेट (internet) स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाॅईस कॉलिंग व १३ ओटीटी ॲप्सचे (OTT apps) मोफत सबस्क्रिप्शन (Subscription) मिळणार आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम, सोनी लिव्ह, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी५, अल्ट बालाजी, जिओ सिनेमा, वूट सिलेक्ट यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. यासह युझरला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅनसुद्धा मिळेल.
दुसऱ्या प्लॅनमध्ये या ॲप्सचा समावेश असेल
हा प्लॅन २४९९ रुपयांचा असून, व्हॅलिडीटी (Validity) तीस दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार असून, युझरला ५०० एमबीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाॅईस कॉलिंग व पंधरा ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन (Subscription) मिळणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्सचा स्टँडर्ड प्लॅन मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण १३ ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओच्या २,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी, हॉटस्टार, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह, झी५, वूट किट्स, सन नेक्स्ट, Hoichoi, Lionsgate Play, Discovery+, Jio Cinema, ShemaryooMe, Eros Now, AltBalaji आणि JioSaavn ची मेंबरशिप मोफत मिळेल. कंपनीप्रमाणे, प्लानमध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन एक वर्षाकरिता मिळते. २,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जीएसटी वेगळे द्यावे लागते.
तिसऱ्या प्लॅनमध्ये या ॲप्सचा समावेश असेल
हा प्लॅन ३९९९ रुपयांचा असून, व्हॅलिडीटी (Validity) तीस दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार असून, युझरला एक Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्यासोबत फ्री व्हाॅईस कॉलिंग व पंधरा ओटीटी ॲप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्येसुद्धा नेटफ्लिक्सचा स्टँडर्ड प्लॅन देण्यात आला आहे.
चौथ्या प्लॅनमध्ये या ॲप्सचा समावेश असेल
हा प्लॅन ८४९९ रुपयांचा असून, व्हॅलिडीटी तीस दिवसांची आहे. यामध्ये ६६०० GB डेटा मिळणार असून, युझरला एक Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्यासोबत फ्री व्हाॅईस कॉलिंग व पंधरा ओटीटी ॲप्सचे मोफत सब्सक्रिप्शन (Subscription) मिळणार आहे, तर यामध्ये नेटफ्लिक्सचा प्रीमियम प्लॅन देण्यात आला आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.