मुंबई : चिपी विमानतळावरील मानापमान नाट्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दादरा नगर हवेलीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी सूचक विधान केले आहे. तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.
दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत धडका मारायची भाषा करत आहेत. परंतु कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.